सूचना: आमचा दुसर्या कोणत्याही बेवसाईटशी काहीही संबंध नाही. याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.

MarathaOnline.com

स्वर्गिय महादेवराव नारायण महाडीक (शेठ) यांच्या विचारातुन साकार झालेली *कडेगावं तालुका (जि. सांगली ) सेवा संघ, मुंबई ही महाराष्ट्रतील्ल खेडय़ापाडय़ांतून मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीकरिता महत्वपुर्ण ठरावी अशी एकमेव संघटना आहे. "संघटनेतुन सामाजिक परिवर्तन" हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. मुंबई बाहेरुन आत्रेल्या व्यक्ती नोकरी, व्यवसाय, उद्योग, रोजगार करुन शहरात चांगल्या प्रकारे वास्तव्य करून रहिवासी बनल्रे आहेत. परंतु सर्व रहिवासी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोईनुसार रहात आहेत.

 

सर्व तालुक्यातील रहिवास्यांना चांगल्या विचारांच्या माळेत गुंफण्याचे काम स्व. महादेवराव महाडीक (शेठ) व त्यांच्या विचाराशी एकरूप असलेल्या रहिवाशांनी सिद्ध करुन दाखवल्रे आहे. हेच वटवृक्ष रुपी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री. उमेशराव महादेवराव महाडीक हे पुढे चालवत आहेत.

 

संघटना खालील समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे.
१. रहिवाशांना एकजुट करून संघटित करणे व सर्वांमध्ये आत्मियता व जनजागृती करणे.
२. रहिवाशांच्या मुलांना शिक्षण व्यवसाय, उद्योग, नोकरी विषयी मार्गदर्शन करणे व तरूण वर्गामध्ये सुप्त गुणांना वाव देणे.
३. प्रेरणादायी व्यक्तीचा सत्कार करणे. विद्यार्थी गुण गौरव करणे, आरोग्या संबंधी जनजागृती करणे. दुष्काळ, अतिवृष्टी व आपत्कालीन कुटुंबांना सहाय्य करणे व मनोबल वाढवणे.
४. शासकिय व निमशासकिय उपक्रम राबवीणे. राष्ट्रीय सण साजरे करणे. शांतता व सुव्यवस्था राखणे.
५. विधवा, घटस्पोटित, विस्थापित कुटुंबांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे.
६. महाराष्ट्रातील्र लाखो मुला-मुलींचे विवाह संबंध जुळवण्यात मदत करणे. वधू वर सुचक केंद्र चालविणे. सामुदायीक विवाहास प्रोत्साहन देणे व सामुदायीक विवाह आयोजित करणे. हुंड्या सारख्या वाईट प्रति विरूद जणजागृती करणे.

 

हे उपक्रम निरपेक्ष भावनेने संघटना करित आहे. आपण जर कडेगांव तालुक्‍यातील रहिवाशी असाल तर रु. १००१ /- (रुपये एक हजार एक) भरून सभासद व्हावे व संघटनेचे फायदे घ्यावेत.
आता घरी बसुन जगभरातील मुला मुलींचे नाव या वेब साईट वर नोंदवु शकता व विवाह जुळवु शकता. नोंदणी फी वार्षिक रु. १०००/- एवढी आहे.

Newly added profiles